Wednesday, 11 October 2017

पेट्रोल स्वस्ताईचे थेंबथेंब मुतणे

 पेट्रोल स्वस्ताईचे थेंबथेंब मुतणे

बैलबाजारात सौदा करताना एखादा चिकट ग्राहक फारच घासाघीस करत भाव उतरवत असतो तेव्हा "काय असे थेंब थेंब मुतता ? जरा नीट भाव करा... " अशी हमखास कोटी केली जाते. अर्थात सध्या फडणवीस सरकारच्या गोवंशहत्याप्रतिबंधक फतव्याने तो बाजारच डबघाईला आल्याने तिथे 'आपलीच मोरी आणि मुतायची चोरी' अशी अवस्था आहे.
अलीकडे दोन-तीन रुपयांनी रुपयांनी पेट्रोल दरवाढ कमी कमी करण्याचा जो सरकारी बैलबाजार चालू आहे तो 'थेंब थेंब मुतणे' प्रकारचाच आहे. पण त्यावर लिहिलं कि फेसबुके भाटांच्या उलट्या बोंबा चालू होतात.

तर सांगायचा मुद्दा असा...

" मोदी सत्तेत आले तेव्हा कच्च्या तेलाच्या किमती होत्या १०७ डॉलर प्रति बॅरल. त्या घटून २०१६ मध्ये २७ डॉलर प्रति बॅरलपर्यंत उतरल्या. सध्या दर आहे ५७ डॉलर. दर घटल्यामुळे सरकारचे इंधनाचे आयात बिल तीन वर्षांत १५५ अब्ज डॉलरवरून ८० अब्ज डॉलपर्यंत घसरलं. " (आजच्या लोकसत्तेत राजेंद्र जाधव. 'विशेष')
म्हणजे सुमारे ५लाख कोटी रुपये एवढा प्रचंड फायदा मोदीसरकारच्या तिजोरीत ३ वर्षात जमा झाला.
ह्यालाच दोन वर्षांपूर्वी पी. चिदंबरम ह्यांनी लोकसत्तामध्ये 'बिनलाभाचे घबाड' असे म्हटले होते. दरवर्षी सुमारे दोनेक लाख कोटीचे तेलाचे घबाड जेटलींच्या बजेटमध्ये आयतेच अंतर्भूत झाले होते. पण ह्या घबाडाचा मोदीसरकार देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी काय उपयोग करू शकले? शून्य! उलट मोदींनी आधी नोटबंदी आणि सध्या जिएस्टीच्या अनाठायी आणि अक्कलशून्य अंमलबजावणीने अर्थव्यवस्थेला मंदीच्या खाईतच लोटलं.
त्यामुळे ऑईलच्या आंतरराष्ट्रीय दराच्या घसरणीचा थेट फायदा जर बाजारात पेट्रोल-डिझेल भाव त्याच पटीने कमी करून ग्राहकांना दिला गेला असता तर किमान त्यातून अर्थव्यवस्थेला गती मिळण्याचेच काम झाले असते हे स्पष्टच आहे. जनतेच्याच खिशाला हात घालण्यासाठी वाढवलेले भाव दोन-तीन रुपड्यानी कमी करण्याची म्हणजे 'थेंब थेंब मुतण्याची' गरजच काय ? पाऊणशे अब्ज डॉलरचे ते 'बिनलाभाचे घबाड' काय कामाचे ?

पण मोदींच्या थापाड्या भाषणबाजीने चेकाळून जे उरलेसुरले भक्तलोक्स " फिस्कल डेफिसिट वित्तीय तूट ४.५ टक्क्यांवरून ३.५ टक्क्यांवर आली, करंट अकाउंट डेफिसिट व्यापारी तुट १.७ टक्क्यांवरून जवळपास ०.७ टक्क्यांपर्यंत आली" वगैरे थापांनी उड्याव कोलांट्याउड्या मारू लागले त्यांनी हि मोदींनी फेकलेली आकडेवारी तेलाच्या बिनलाभाच्या घबाडातुन फुगलेली आहे, मोदींच्या कर्तृत्वाने नव्हे, हे लक्षात घ्यायला हवे!