संजय सोनवणी...एक
तरुण झंझावाती अवलिया !
तीन वर्षापूर्वी
बोरीवली (पश्चिम) इथे जुन्या पुस्तकांच्या दुकानातून काही पुस्तके घेतली पण ती
आमच्या गावी नेउन ठेवली होती. काही दिवसापूर्वी गावी गेलो होतो तेव्हा दुपारी
त्यातील एक पुस्तक वाचायला घेतल. 'मृत्युरेखा' लेखक : संजय सोनवणी! सुखद झटका. राजीव गांधीची हत्या आणि
तमिळ टायगर्स च्या तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे चित्र रेखाटणारी कादंबरी.
दोन वर्षापूर्वीची
अशीच एक घटना. मला ऐतिहासिक पुस्तके आवडतात म्हणून माझी पत्नी सौ. प्रीती हिने
पालघर कॉलेजच्या ग्रंथालयातून एक पुस्तक मला आणून दिलं होत. 'The Awakening' चा मराठी अनुवाद. संजय सोनवणीनि मृत्यू सारख्या गूढ गहन
विषयावर राणी शिबाच्या माध्यमातून किती बोधक तत्वचिंतन केले आहे आणि तेही इंग्रजीमध्ये !
मित्रानो, माझी सोनवणी सरांशी
ओळख झाली ती फेसबुक च्या माध्यामतून. मी पेशवाई कालीन इतिहासातील काही विषयावरून चर्चा करीत असताना
संजय सरांनी माझी कमेंट like केली आणि अहो आश्चर्यम! ती चर्चा सोडून वाद घालणार्यांनी पळ
काढला. मग त्यांच्या ब्लॉग चा मी एक वाचक बनलो नाही तर नवलच! 'पानिपत असे घडले' ह्या ग्रंथा विषयी
चर्चा करताना संजय क्षीरसागर ह्यांच्याकडून श्री.सोनवणी ह्यांच्यातील प्रकाशकाविषयी
समजले. पण सरांशी चर्चा करायचा योग येत नव्हता. मध्यंतरी एकदोन वेळा दूरदर्शनवरील चर्चेमध्ये
त्यांचे विचार ऐकण्याचा मात्र योग आला.
हि दोन्ही पुस्तके
अशी अचानक माझ्या वाचनात आली आणि मी धन्य झालो. आजही मी त्यांचा ब्लॉग आणि त्यातील
ते सर्वंकष लेखन ह्याचा फार मोठा चाहता आहे. जाती आणि जातीसंस्थेचा इतिहास, हिंदू आणि वैदिक
धर्म, संस्कृत आणि
प्राकृत भाषा ह्या विषयावरील त्यांचे संशोधनात्मक लेख, इ. मुळे मी
त्यांच्या सानिध्यात कधी आलो ते कळलेच नाही. मग फेसबुक वरून केलेल्या चर्चा, नंतर फोन करून
झडलेले संवाद आणि अलीकडे सर मुंबईला आले तेव्हा झालेली प्रत्यक्ष भेट.
सोनवणी
सरांच्या साहित्यक्षेत्राची भरारी
ऐतिहासिक, सामाजिक, संशोधनात्मक, थरार, विज्ञान, तत्वज्ञान, नीतिशास्त्र, विश्वनिर्मिती
शास्त्र, समाजशास्त्र, काव्यसंग्रह, नाटके अशा विविध साहित्य प्रकारात तसेच शेती, शिक्षण, अर्थकारण, सामाजिक, आंतरराष्ट्रीय अशा
बहुविध विषयात त्यांचे विपुल लेखन प्रकाशित झाले आहे. मराठी तसेच इंग्रजी ह्या
दोन्ही भाषेत त्यांची साहित्यसंपदा ८० ग्रंथांच्या
रूपाने प्रसिद्ध झाले आहे.
पुरस्कारांसाठी पुस्तके पाठवीणे हा
लेखकाचा अपमान आहे असे त्यांचे ठाम मत असल्याने त्यांनी स्वत:वर आणि त्यांच्या प्रकाशकांवर "पुरस्कारांसाठी
पुस्तके पाठवायची नाहीत." असे
बंधन घातल्यामुळे त्यांना एकही साहित्य पुरस्कार मिळालेला नाही! असा हा प्रथितयश सिद्धहस्त साहित्यिक आणि प्रकाशक ८७व्या
अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभा
आहे.
मराठी
वाचक-साहित्यिकांचे संवर्धन करणे, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी जन आंदोलन उभारणे, राज्य सांस्कृतिक
धोरणाच्या अंमलबजावणी साठी प्रयत्न करणे, प्रशासकीय मराठीत
सुधारणा करणे हि त्यांची भूमिका देखील मराठी साहित्य संस्कृती ला अंतर्बाह्य
बदलाच्या दिशेने नेणारी आहे. अशा ह्या क्रांतिकारक साहित्यिकाला ह्या निवडणुकीत
सुयश लाभो आणि त्या निमित्ताने मराठी साहित्य परंपरेला नव्या उंचीवर नेण्याचे
सामर्थ्य त्यांना प्राप्त होवो हीच सरस्वती चरणी प्रार्थना!
राकेश पाटील.
( टीप: सदर लेख
सोनवणी सरांना दाखवून पोस्ट करणार होतो परंतु ते दौऱ्यावर असल्याने शक्य झाले
नाही. म्हणून शब्दयोजना, वाक्यरचना, माहितीसंबंधी काही चूकभूल असल्यास क्षमस्व.)
संजय सोनवणी: प्रकाशित साहित्य
ऐतिहासिक कादंब-या:
अखेरचा सम्राट (२ आवृत्त्या), ...आणि पानिपत, कुशाण (२ आवृत्त्या) क्लिओपात्रा (७ आव्रुत्त्या)
तत्वज्ञानात्मक कादंब-या:
शुन्य महाभारत (२ आवृत्या), कल्की (३ आवृत्त्या), यशोवर्मन (४ आवृत्त्या)
सामाजिक कादंब-या:
सव्यसाची (२ आवृत्त्या), काळोख (२ आवृत्त्या), खिन्न
रात्र (३ आवृत्त्या), विकल्प (३ आवृत्त्या), खळबळत्या सागरकाठी (२
आवृत्त्या), अखेरचे वादळ (३ आवृत्त्या)
पौराणिक कादंब-या:
अश्वत्थामा (६ आवृत्त्या), ओडीसी (३ आवृत्त्या)
थरार-कादंबर-या:
म्रुत्युरेखा (५ आवृत्त्या), विश्वनाथ (२ आवृत्त्या),
अंतिम युद्ध (३ आवृत्त्या) ब्लडी आयलंड, शिल्पी (२ आवृत्त्या), रक्तराग (२
आवृत्त्या), महाद्वार (३ आवृत्त्या), अंतिम युद्ध (३ आवृत्त्या), वार टाईम
(३ आवृत्त्या), पराभव (३ आवृत्त्या), अपहरण (४ आवृत्त्या),
सांस्क्रुतीक थरार:
असूरवेद (३ आवृत्त्या)
वैद्यकीय कादंबरी:
थेंब...थेंब म्रुत्यू...(३ आवृत्त्या) (एड्सवरील भारतातील पहिली कादंबरी.)
राजकीय थरार:
बिजींग कोन्स्पिरसी (२ आव्रुत्त्या), रक्त हिटलरचे, (३
आव्रुत्त्या), ब्ल्यकमेल (२ आवृत्त्या), डेथ ओफ़ द प्राइममिनिस्टर (४
आवृत्त्या),
राजकीय उपहास:
गुडबाय प्राइममिनिस्टर, आभाळात गेलेली माणसं (३ आवृत्त्या)
वैज्ञानिक संशोधन:
अवकाश ताण सिद्धांत आणि विश्वनिर्मिती
तत्वज्ञान:
नीतिशास्त्र, ब्रह्मसूत्र रहस्य
इतिहास संशोधन:
हिंदु धर्माचे शैव रहस्य, (३ आवृत्त्या) विट्ठलाचा नवा
शोध, भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते महाराजा यशवंतराव होळकर, (तीन
आवृत्त्या) महार कोण होते?...उद्गम:संक्रमण:झेप, , प्राचीन आर्यांचे
धार्मिक तत्वद्न्यान, वाघ्याचे सत्य.
सामाजिक/वैचारिक:
मुंबई
२६/११...पुर्वी आणि नंतर, (दोन आवृत्त्या) प्रेम कसे करावे? (६ आवृत्त्या),
सद्दाम हुसेन: एक झंझावात, कार्पोरेट व्हिलेज- एक गांव:एक कंपनी:एक
व्यवस्थापन, दहशतवादाची रुपे
काव्य संग्रह:
प्रवासी, पर्जन्यसुक्त, संतप्त सुर्य
नाटक:
मीच मांडीन खेळ माझा, राम नाम सत्य हे!, विक्रमादित्य, रात्र अशी अंधारी, गड्या तु माणुसच अजब आहेस, त्या गावाचं काय झालं?
बाल/किशोर साहित्य:
रानदेवीचा शाप, साहसी विशाल, रे बगळ्यांनो, सोन्याचा
पर्वत (चार आवृत्त्या), दुष्ट जोनाथनचे रहस्य, रत्नजडीत खंजिराचे रहस्य,
सैतान वज्रमुख, अंतराळात राजु माकड, नरभक्षकांच्या बेटावर विजय.(तीन
आवृत्त्या),
इंग्रजी:
Death of the prime minister
On the brink of Death (3 Editions.)
The mattalions (2 Editions)
The Jungle (3 Editions)
Last of the wanderers (3 Editions)
The Awakening
Dancing with the Rains (Full length play)
Raging Souls
Heart of the Matter (full length play)
Monsoon Sonata (Poetry)
Ancient Aryan's Thought on Religion
On the brink of Death (3 Editions.)
The mattalions (2 Editions)
The Jungle (3 Editions)
Last of the wanderers (3 Editions)
The Awakening
Dancing with the Rains (Full length play)
Raging Souls
Heart of the Matter (full length play)
Monsoon Sonata (Poetry)
Ancient Aryan's Thought on Religion
अन्य:
संगीत:
मनात माझ्या (गीत-संगीत-गायन), ओ जानेजां (गीत-संगीत. गायक-
नितीन मुकेश), इट्स माय ड्रीम (संगीत-गीत), अखेरचे वादळसाठी गीतलेखन,
संगीत...गायिका उषा मंगेशकर.
संकीर्ण:
किर्लोस्कर ते अन्य अनेक मासिके, साप्ताहिके व दैनिकांत शेकडो लेख. ब्लोगवरील प्रकाशित लेखसंख्या ४५०.
हिरण्यदूर्ग, जातिसंस्थेचा इतिहास.
No comments:
Post a Comment