हा देश कधीहि
धर्म-निरपेक्षच नव्हता आणि नसेल, हि भाषा उलट अधिक उद्दामपणाची
आहे.
कॉंग्रेस, भाजप किंवा शिवसेना ह्या राजकीय पक्षांना काय वाटते किंवा ते कोणत्या धर्मियांचे लांगुलचालन वैगैरे करतात हा ज्यांच्या त्यांच्या क्षुद्र राजकारणाचा भाग असेल तो असेल. पण हा देश आणि देशाची राज्यघटना सोशालीस्ट आणि सेकुलर आहे ह्यात काही वाद असण्याची गरज नाही.
मुळात बाबासाहेबांनी सोशालीस्ट आणि सेकुलर हे शब्द प्रिएम्बल मध्ये का घातले नाहीत ह्याचे तेव्हाच विश्लेषण केले होते कि आपली घटना मुळातच समाजवादी आणि धर्म-निरपेक्ष आहे! नंतर ते शब्द घटनेच्या प्रिएम्बलमध्ये मुद्दामहून घालावे लागले ह्यातून कदाचित त्या शब्दांचे महत्व आणि गांभीर्य लक्षात यावे. सध्याचे देशातील धर्मांध सत्ताकारण आणि त्यांची खोडसाळ वक्तव्ये लक्षात घेता घटनेतील समाजवादी आणि धर्म-निरपेक्ष ह्या शब्दांची आजच्या काळात अत्याधिक गरज असल्याचे लक्षात येते.

धर्मांधाना स्वत:चाच वर्चस्ववाद हवा असतो. त्यांना लोकशाही,
सर्वधर्मसमभाव, समाजवाद प्रणीत शासन अभिप्रेत नसून धर्मांध हुकुमशाही सत्ता
हवी असते. जगभर धर्मांधांनि, क्रूरकर्म्यांनि जो उच्छाद मांडला आहे तो
लक्षात घेता भारतातील धर्मांधांच्या छुप्या आकांक्षाना सध्या कोंब फुटले
आहेत हे उघड आहे. धर्माधारित राज्य म्हणून आपल्याच सोबत स्थापित झालेल्या
पाकिस्तानची काय दुरवस्था झाली हे वेगळं सांगायला नको!
कालच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातून राज्यघटनेतील (secular, socialist) सेकुलर, समाजवादी हे शब्द (चुकून) मोदीसरकारने वगळले आणि दिल्लीतील भाषणात ओबामांनी भारत धर्मांधतेच्या मार्गाने गेल्यास बरबाद होईल असा इशारा देताना त्यांनी महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, बाबासाहेब आंबेडकर, कैलाश सत्यार्थी ह्या महान भारतीयांसोबतच (अल्पसंख्यांक समुदायातील) शाहरुखखान, मेरीकोम, मिल्खासिंग ह्यांचा आवर्जून उल्लेख केला. ओबामांनी दिलेलि हि चपराक त्यांना आमंत्रित करणाऱ्यांनीच गांभीर्याने घ्यायला हवी. सोनारानेच कान टोचलेले बरे असतात, असं म्हणतात!

No comments:
Post a Comment