मा. मनमोहनसिंगांनी नोटबंदीवरील राज्यसभेतील फक्त ७ मिनिटांच्या प्रभावी
भाषणात नोटबंदीच्या अर्थव्यवस्थेवरील परिणामांचा उहापोह करून पंतप्रधानांना
त्यावर व्यवहार्य उपाययोजना करण्यास सांगितले होते. तसेच नोटबंदीवरील
संसदीय समितीच्या बैठकीत आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल अडचणीत सापडले
तेव्हा स्वात: माजी गव्हर्नर मनमोहनसिंग ह्यांनी त्यांची बाजू सावरली होती.
विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या
अभिभाषणावरील आभार प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देताना माजी पंतप्रधान
मनमोहनसिंग ह्यांच्यावर रेनकोट वगैरे खालच्या पातळीतील शेरेबाजी आणि
वैयक्तिक टीकाटिप्पणी केली. मा. मोदीजींनी आपल्या ८० मिनिटांच्या भाषणात
त्या नोटबंदीबद्दल कोणतेही माहितीपूर्ण वक्तव्य न करता केवळ प्रचारकी
थाटाची आक्रमक भाषा वापरली. त्याबद्दल विचारले तेव्हा मा. मनमोहन सिंग
ह्यांनी "ह्यावर आपल्याला काहीही बोलायचे नाही" इतकीच संयमित प्रतिक्रिया
दिली...
No comments:
Post a Comment