Wednesday, 16 August 2017

"अ टेस्ट ऑफ योर ओन मेडिसिन" :रामरहीम तमाशा

"अ टेस्ट ऑफ योर ओन मेडिसिन" म्हणजे कालचा रामरहीम तमाशा होय.. कसे हिंदी न्यूज चॅनेलवाले अगदी युद्धपातळीवर शीर तळहातावर घेऊन वगैरे रिपोर्टींग करीत होते... एरव्ही २४ तास भाजपच्या xx कुर्वाळणारे काल बेधडक भाजप सरकारचे , खट्टरच्या खटारा सरकारचे वाभाडे काढत होते. कारण आग थेट बुडखालीच लागलेली, कुणाच्या ओबी व्हॅन पेटल्या, कुणाचे वार्ताहर फाटकावले गेले, कोणी पत्रकार जीव घेऊन पळालेले वगैरे वगैरे... सारा मामलाच अंगावर कोसळणारा ... मग आणखी काय होणार? पाणी गळ्याशी आल्यावर माकडीण जशी डोक्यावरचे पिल्लू पायाखाली टाकून जीव वाचवते तसला प्रकार... असो.

1. बिकाउ मीडिया असो कि त्यांची नेतेमंडळी कि त्यांचे भक्तपरिवार... हा जो उन्माद तुम्ही वेळोवेळी भडकवत ठेवला आहे तो शेवटी भस्मासूर बनून तुमच्या पाठी लागणारच. कधी राजकीय, कधी धार्मिक-जातीय, तर कधी राष्ट्रवाद-देशभक्तीच्या नावाखाली फक्त उन्माद माजवून देशाच्या लोकशाहीला, धर्मनिरपेक्षतेला, विविधतेला कमजोर केल्यावर हा भस्मासुर एकनाएक दिवस तुमच्याच डोक्यावर हात ठेवायला सरसावेल... तेव्हा कुठे पळणार? पाकिस्तानात?


2.  २६/११ च्या दिवशी दिवसभर शहीद हेमंत करकरेंच्या बलिदानाचं गुणगान गायचं ...
आणि तो कर्नल पुरोहित नावाचा आरोपी जामिनावर सुटलाय तर त्याला डोक्यावर घेऊन नाचायचं ...
हे एकाचवेळी कसं काय जमतं आपल्या मराठी न्यूज चॅनेलवाल्याना ?

No comments:

Post a Comment