डॉ. दाभोळकर ह्यांची
निघृण हत्या होऊन आता दोन दिवस उलटले आहेत. मंगळवारी हि दुर्दैवी घटना घडली
आणि सुन्न झालो. मनात जो भडका जो उडाला होता तो आता शमला आहे.
काल एक बरे झाली कि
सुस्तावलेल्या सरकारने जादूटोणा विरोधी कायद्याचा वटहुकुम
काढून आपली चूक सुधारली आणि डॉ. दाभोळकरांच्या विरोधकांना
छान चपराक दिली. लगोलग विरोधकांनी आपली भूमिका जाहीर करून ह्या अंधश्रद्धा निर्मुलन प्रकरणात किती घाणेरडे राजकारण खेळले
जातेय त्याची चुणूक दाखविली!
अनिस किंवा दाभोळकर ह्यांच्या विचारसरणीशी माझा कधी संबंध आला
नाही. मी फार धार्मिक नाही पण दैनंदिन सर्व रीतीरिवाज पाळतो. लग्न करताना
पत्रिका पाहणे, लग्नानंतर
सत्यनारायण पूजा हे सर्व केले आहे. पण त्यांच्या हत्येमुळे त्यांचे विचार किती महत्वाचे
आहेत हेच लक्षात आले. त्यांचे विचार जाणून घेऊन बुद्धिप्रामाण्य मार्गाकडे माझी
वाटचाल सुरु झाली एवढे नक्की.
पण एक मात्र खरे कि दाभोळकर हा माणूस
अंधश्रद्धा निर्मूलनाचे समाजकार्य करतोय म्हणून त्यांच्याबद्दल
आदरच होता. जसा अण्णा हजारे, प्रकाश आमटे, मेधा पाटकर ह्यांच्या विषयी असतो तसाच. त्यातदेखील मला प्रकाश आमटे
आणि डॉ. दाभोलकर ह्यांचे विशेष महत्व वाटते कारण त्यांचा साधेपणा आणि
विनयशील वृत्ती. राजकारणातील तर्कटपण काही सामाजिक नेत्यामध्ये सहज उतरते
आणि त्यांच्या बोलण्या-वागण्यातून ते दिसते. पण डॉ. दाभोलकर हा माणूस
अतिशय शांतपणे आपले ठाम विचार मांडत राहिला आणि विरोधकांचे विचारही त्याच
शांतपणे ऐकत राहिला. हेकेखोरपणा, दुराभिमान किंवा आक्रस्ताळेपणा त्यांच्यात कधी
जाणवला असेल असे मला वाटत नाही.
अशा माणसाची हत्या होते आणि काही
समाज घटकातून त्या हत्येचे उघड किंवा छुपे समर्थन
केले जाते हि अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. एका महात्म्याचा पुन्हा खून झालाय
आणि काही लोक सोयीस्कर भूमिका घेऊन नेहमीची चिखलफेक करण्यात दंग आहेत असे
दिसते. हि अत्यंत घृणास्पद आणि विघातक विकृती आहे.
इतिहास, राजकारण, संस्कृती, समाज, इ. विषयावर आपण नेहमीच भांडतो कारण विचार -चर्चा ह्यातून
प्रबोधन होते असे म्हणतात. पण वैचारिक लढाईचे दिवस आता राहिले आहेत का? अशी शंका येतेय. डॉ. दाभोळकर नावाच्या
महात्म्याची हत्या घडवून धर्मांध मुलतत्व वाद्यांनी आपल्यावर मात केली
आहे. तेव्हा आता आपण सर्वांनीच आत्मपरीक्षण करायची गरज निर्माण झाली आहे.
विचारांचा विरोध विचारांनीच व्हायला हवा
होता. एक आधुनिक समाज म्हणून आपण फार मोठी चूक करून बसलोय असे
मला वाटते. कॉम्पुटर, इंटर नेट, फेसबुक च्या विज्ञानयुगातून थेट पाषाण युगीन किंवा मध्ययुगीन अंधारात
जाऊन पडल्यासारखे झाले आहे!
राकेश पाटील.
दाभोलकर किवा ANIS हे कायम वादातीत होते.. किंबहुना अश्या पध्यतिच्जे व्यक्तिमत्व हे कायम वादातीत असतात Dr. दाभोलकर यांना त्याचे सहकारी संतच समजत होते तर काही लोकांना ते लबाड साधू वाटायचे.
ReplyDeleteसमाजकंटक किव्वा कट्टर विरोधक आजच्या Excited युवक वर्गांचा चांगला वापर करतात. मुळात समाजकंटक , कट्टर विरोधक हे वर्षा वर्षा पासून आहेत महत्वाचे म्हणजे आपली लोक हे नेहमी का झोपलेली किवा अति excited असतात. केवळ राजकाराचा किव्वा समजा कान्ताकाच्या प्रवाहाने जाने आपली जनता कधी थांबवतील ?
लोकमान्य टिळक यांनी भोळ्या आणि मुर्ख उत्साही लोकांना चांगला प्रवाह दिला. श्री गणेश चतुर्थी आणि शिवजयंती उत्सवांच्या निमित्तानी त्यांनी लोकांना एकत्र केले आणि त्यांना योग्य शिकवण , प्रभोधन दिले. आज आपल्या देशांना खर्या लोकमान्यांची गरज आहे. लोकांना शांत डोके ठेवून विचार करण्याची गरज आहे. मी असे सांगत नाही के लोकांनी आपला राग योग्य पद्धतीने वापरणे गरजेचे आहे. अन्याय च्या विरुद्ध राग बंड किंवा आक्रमक होणे हे योग्य आहे. पण आपला एखादा कंटक वापर करतोय कि नाही याचा विचार करणे प्रत्येक व्यक्ती चे कर्तव्य आहे.
... पार्थ शिरगावकर