पहिलाच दिवस होता, वसई पॉलीटेक्निकमध्ये आणि एपिएम (Applied Mechanics)
शिकवायला देशमुख सर होते. मूर्ती लहान पण एकदम कडक, खरंतर चिडखोर स्वभावाचे
सर होते. (अलीकडेच ते अपघातात गेले बहुधा.) :(
तर पहिल्याच दिवशी सर काहीतरी शिकवीत होते. मी आणि बिपीन Mhatre पहिल्याच बेंचवर बसलो होतो. (दोघेही कॉलेजच्या एसेस्सिच्या मेरीट लिस्टमध्ये पहिल्या दोन नंबरवर होतो...! पण शाळेतल्या मेरीटच्या भव्यदिव्य आठवणींपेक्षा पॉलीटेक्निकचे तंत्रमय दिवस संघर्षाचे होते, बरं. ) लेक्चर चालू होतं आणि पाठीमागून कुणीतरी खोडसाळपणा केला... आणि इथेच माझी शाळेतली पारंपारिक खोड पुन्हा आडवी आली. म्हणजे मी हसलो. :)
देशमुख सर आधीच चिडखोर. त्यात मी पुढे बसून दात काढतोय म्हटल्यावर त्यांचा पारा आणखी चढला. खाडकन माझ्या समोर आले, डेस्क वरची माझी नोटबुक घेतली आणि दिली क्लासबाहेर भिरकावून... हो, अक्षरश: हाकलून काढलं मला, वर्गातून...पहिल्याच दिवशी.
त्या देशमुखसरांच्या स्मृतींना टीचर्स डे निमित्त अभिवादन.

No comments:
Post a Comment