कथित निश्चलनीकरणाचे फॅक्ट्स अँड फिगर्स पाहता आतापर्यंत आलेल्या रिपोर्ट्समधून खालीलप्रमाणे माहिती समोर आली आहे.
- भारतातील १६.२४ लाख कोटी रुपयांच्या चलनापैकी ८६% चलन (सुमारे १४ लाख कोटी) हे ५०० व १००० च्या नोटांच्या स्वरूपात.
- (मार्च २०१६ मध्ये ५०० रुपयांच्या १५७० कोटी नोटा तर १००० रुपयांच्या ६३२ कोटी नोटा)
- ह्या नोटा नव्याने (५००, १०००, २०००, १००, इ. स्वरूपात) छापण्यासाठी सुमारे १ वर्षापर्यंतचा कालावधी लागू शकतो. भारतीय चलन छपाईची मासिक क्षमता सुमारे ३०० कोटी नोटा.)
- पैकी ५.४४ लाख कोटी १५ दिवसांत आजपर्यन्त बँकेत जमा.(३१ डिसेंबर पर्यंत किती व्हाईट चलन जमा होईल आणि किती काळापैसा ते सिद्ध होईल.)
- भारतातील ९०% पेक्षा जास्त (कदाचित ९७% by व्हॉल्युम ) व्यवहार कॅशच्या स्वरूपात.
(हे स्मार्ट व्यवहार करणाऱ्या १०% मध्यमवर्गाला कसे समजवायचे?)
- फक्त ६% काळापैसा कॅशच्या स्वरूपात.
(बाकी ९४% चे काय ?)
- 'फेक करन्सी'चे प्रमाण ४०० कोटी म्हणजे ०.०२८ % (१४,१८० बिलियन ५००-१००० नोटांच्या निश्चलनीकरणाच्या) इतकेच.
- काळय़ा पैशाची समांतर अर्थव्यवस्था भारतात एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या २२.२ % (२२५० अब्ज रुपये) सुमारे २.२५ लाख कोटी!
-
भारतातील केवळ ३०% लोकसंख्या बँकिंगशी जोडलेली (forget डेबिट कार्ड्स, ATM
& इंटरनेट बँकिंग). ग्रामीण भागात बँकिंग परिस्थिती आणखी विपरीत.
त्यात जिल्हा बँकांवर सरकारची बंदी!
(सुमारे ८०% भारतीयांच्या व्हाईट पैशाचे रूपांतरण कसे व्हायचे? त्यासाठी दैनंदिन ४००० ते ४५०० ते २००० अशी मर्यादा आहेच.)
-
देशात बँकांच्या १,३४,००० शाखा आणि २,१५,००० एटीएम यंत्रे आहेत...अगदी
एखाद्या बँक शाखेत किंवा एटीएम यंत्रासमोर तरी रोज ११ कोटी लोकांना नोटा
बदलण्यासाठी दिवसभर रांगेत उभे राहावे लागले. त्याचा उत्पादनावर व
उत्पादनशीलतेवर काय परिणाम झाला असेल?... नोकरी करणाऱ्या लोकांपकी ३३%
रोजंदारी कामगार आहेत. त्यांची संख्या अंदाजे १५ कोटी आहे. अचानक त्यांना
काम मिळणे बंद झाले. त्यांना कामावर ठेवणाऱ्यांकडे पैसे नव्हते... - माजी
अर्थमंत्री पी. चिदंबरम
(रांगेत उभे राहणाऱ्या कोट्यावधी लोकांचे लाखो कोटी मॅन-अवर्स वाया चाललेत... ह्याचे अर्थकारण कोण तपासणार?)
- २०१५ मध्ये फक्त १.३५ लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली जो सात वर्षातला नीचांक आहे- मा. राष्ट्रपती
( आधीच मंदीच्या आर्थिक संकटात सापडलेल्या रोजगारनिर्मितीचे पुढे काय होणार?)
-
एकट्या राजस्थानमध्ये निश्चलनीकरण निर्णयाच्या २ महिन्यांत
उद्योगक्षेत्रात १ लाख कोटींचा तोटा अपेक्षित आहे- अनुराग शर्मा,
Federation of Rajasthan Trade and Industry (Forti)
(भारतात एकूण अर्थव्यवस्थेला किती लाख कोटींचा मोठा फटका बसेल???)
No comments:
Post a Comment