Thursday, 16 March 2017

उत्तर प्रदेश निवडणूक निकाल विश्लेषण

उत्तर प्रदेशात विक्रमी ३१२ जागा जिंकणाऱ्या भाजपला ३९.७ % मते मिळाली. घटक पक्षांना १.७% मते (१३ जागा) मिळाल्या. २०१४च्या लोकसभेत भाजपला ४२.३% (७१ जागा) आणि घटक पक्षांना १% (२जागा) मते मिळाली होती. समाजवादी पार्टीला २१.८% ( ४७ ) आणि काँग्रेसला ६.२% (७) अशी मतांची टक्केवारी आहे.

२०१४ मध्ये समाजवादी २२.२% (५) आणि काँग्रेस ७.५% (२) अशी स्थिती होती. सध्या बसपाला २२.२% (१९) मते असून २०१४ मध्ये १९.६% (०) मते होती.

२००९च्या लोकसभेत समाजवादी २३.२६ % (२३), बसपा २७.४२ % (२०), भाजप १७.५ % (१०) आणि काँग्रेस १८.२५ % (२१) अशी स्थिती होती. 

भाजपने लोकसभेतील यशाची पुनरावृत्ती करताना आपली मतांची टक्केवारी कायम राखली. इतरांनी सुद्धा आपली मतांची टक्केवारी कायम राखली. परंतु आघाडी करूनही समाजवादी आणि काँग्रेस मिळून २८% च्या वर जाऊ शकले नाहीत. सुमारे १०% मते ज्यास्त मिळवून भाजपने पुन्हा एकतर्फी विजय मिळविला.
२०१२च्या विधानसभेत समाजवादी २९.१५% (२२४), बसपा २५.९१% (८०), भाजप १५% (४७) आणि काँग्रेस ११.६३% (२८) + RLD २.३३% (९) अशी स्थिती होती. २००७ च्या विधानसभेत समाजवादी २५.४३ % (९७), बसपा ३०.४३ % (२०६), भाजप १६.९७ % (५१) आणि काँग्रेस ८.६१ % (२२), RLD (१०) अशी स्थिती होती.
२००७ ते २०१२ मध्ये भाजप आणि काँग्रेसच्या जागा आणि मते ह्यात विशेष फरक पडला नाही. सपा आणि बसपा मात्र ५% मतांच्या शिफ्टमुळे एकतर्फी सत्ता मिळवून बसले किंवा पडले! परंतु सपा आणि बसपा ह्यांच्याकडे एकूण मताधार ५५% होता. तो २०१४ मध्ये ४०-४२% इतका घसरला किंवा भाजपकडे सुमारे १५% सरकला. काँग्रेसचाही ७-८% जनाधार भाजपकडे सरकल्याने दिसते. एकूण २०१४ पासून भाजपने आपला मताधार २०-२५% वाढवला आहे हे स्पष्ट होते. मोदीलाटेतला तो व्होट शेअर ह्या विधासभेतही टिकवण्यात अमित शहा आणि मोदी यशस्वी ठरले, हे विशेष.

इथे बिहारच्या तुलनेत विरोधक तागडे आव्हान उभे करू शकले नाहीत. बिहारमध्ये RJD , JDU काँग्रेस महागठबंधन झाल्याने लोकसभेतील विभागलेली मते एकत्र येऊन भाजपच्या मताधारापेक्षा सुमारे ६-८% व्होट शेअर अधिक झाल्याने भाजप आघाडीचा एकतर्फी पराभव झाला. लोकसभेतील व्होट शेअर साधारण तितकाच कायम राहिला.

युपीमध्ये सपा , बसपा आणि काँगेस ह्यांचा एकूण व्होट शेअर सुमारे ५०% होता आणि तो ह्या निवडणुकीतही तितकाच कायम आहे. अर्थात त्याची विभागणी झाल्याने भाजपचा ४०% व्होट शेअर सपा , बसपा आणि काँगेसच्या एकतर्फी पराभवास पुरेसा ठरला. हि विभागणी न झाल्यास त्यांचा ५०% व्होट शेअर भाजपचा एकतर्फी पराभव करण्यास आजही सक्षम आहे! तसेच भाजपने जो ओबीसी, दलित मतदारांचा २०% व्होट शेअर आकर्षित केला आहे, त्याची घरवापसी कशी करता येईल, ह्यावर काँग्रेस, समाजवाद्यांनी विचार करायला हवा!

अपुर्ण..)

1 comment:

  1. Las Vegas - MGMCD
    Casino in 사천 출장안마 Las Vegas - Visit 목포 출장마사지 us for a visit, walk to the MGM 김제 출장샵 Hotel and Casino, There is no slot machine on the casino floor. You don't have to come 계룡 출장마사지 with all the slot machines 세종특별자치 출장마사지

    ReplyDelete