तर ह्या सगळ्या गदारोळात काल कुणीतरी आपल्या कृषिप्रधान भारत देशाचे माजी
कृषिमंत्री शरद पवार ह्यांची मुलाखत दाखविली. त्यात त्यांनी 'हमीभाव' ह्या
आजच्या गाजणाऱ्या मुद्द्यावर काही मते मांडली. मिनिमम सपोर्ट प्राईस किंवा
शेतमालाला किमान हमीभाव म्हणजे सरकारने जाहीर केलेला तो भाव कि
त्याच्यापेक्षा शेतमालाची किंमत खाली घसरली तर सरकारने स्वतः बाजारात
उतरून त्या हमीभावाने शेतमालाची खरेदी करावी जेणेकरून हमीभावापेक्षा
बाजारभाव खाली घसरूच नये.
...आणि आपले सेटलमेंटवाले शेतकरी नेते व अभ्यासू फडणवीस सरकार शेतकऱ्यांना काय आश्वासन देतात ? कि हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी करणाऱ्यांवर आम्ही खटले भरू! पवारसाहेब म्हणाले तुमची जबाबदारीच आहे हमीभावाने तूर खरेदी करून बाजारभाव कंट्रोल करणे. तुम्ही खटले बिटले काय भरता?
आधी अशी परिस्थिती उद्भवलीच नव्हती त्यामुळे आताच्या सरकारने आधीच्या कोणत्याही सरकारपेक्षा रेकॉर्ड तूर खरेदी केली वगैरे भूलथापांना काहीच अर्थ नाही.
तर एकूण सध्याची अभ्यासाची पातळीच इतकी घसरलीय कि हे असे मूलभूत प्रश्न उभे राहतात. . भुईमूग नक्की कुठे बाजतो जमिनीच्यावर कि खाली ? इथपासून अभ्यासाचा गमभन सुरु करावा लागेल कि काय असा काळ आहे . 'हमीभाव' हा तर मॅट्रिकच्या गणिताचा पेपर लांबच राहिला, काय?
जाऊद्या, त्यापेक्षा अजित पवारांची फाईल हा विषय किती सोप्पा असतोय!

No comments:
Post a Comment