गोब्राह्मणप्रतिपालक :
देव-धर्म , देव-ब्राह्मण, गो-ब्राह्मण, देव-धर्म-गोब्राह्मण ह्या आशयाचे शब्द धर्मविषयक बाबीत सर्वसाधारणपणे वापरले जातात. ह्यातील प्रत्येक उपशब्द हा 'धर्म' ह्या व्यापक अर्थाने वापरला जातो. "देवाब्राह्मणांच्या साक्षीने वचन दिले" इ. धार्मिक अर्थाने 'गोब्राह्मणप्रतिपालक' शब्दाचे विश्लेषण केल्यास गुंता सुटतो. हे शब्द देव, गाय, ब्राह्मण असे शब्दश: न घेता 'धर्म' ह्या व्यापक अर्थाने योजले असतात. धर्माचा प्रतिपालक असा साधारणतः: अर्थ असायला हरकत नाही. स्वराज्यात गोहत्या बंदी किंवा गोवंशहत्याबंदी होती का? वैदिक ब्राह्मणांसाठी स्पेशल कायदेकानून होते काय? शेतकऱ्यांची भाकड जनावरे, गाई-गुरांचे बाजार, चर्मोद्योग करणारे कारागीर ह्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी आजच्यासारखी गोरक्षक नावाची जमात वगैरे राजांनी नियुक्त केली होती का? ह्या प्रश्नांची उत्तरे शोधली तर 'गोब्राम्हणप्रतिपालक' ह्या शब्दातुन फसवणूक होणार नाही.

धर्मनिरपेक्ष (सेकुलर) :
महाराज स्वतः: लिंगपुजक होते, शिवाचे उपासक होते, तुळजाभवानीचे (शक्तीचे) भक्त होते. परंतु केळशीचे बाबा याकूत ते सज्जनगडाच्या समर्थ रामदासस्वामी पर्यंत अनेक संत-सत्पुरुषांना त्यांनी धर्म-आश्रय दिला होता. महाराजांच्या लष्करातही हा सर्वसमावेशक हिंदू-मुस्लिम, अठरापगड जातींचा समुच्चय दिसून येतो. त्या अर्थाने महाराज सर्वसमावेशक विचाराचे होते. सांप्रत कालसंदर्भात राजांचे वर्तन धर्मनिरपेक्ष (सेकुलर) स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट दिसते.
शिवाजीराजे मुस्लिमविरोधी?
राजकीय दृष्ट्या महाराज अदिलशाही-मुघलांशी लढले कारण ते प्रस्थापित सत्ताधारी होते. परंतु राजांना जावळीच्या चंद्रराव मोरेंशी लढावे लागले. राजांचे अनेक स्वकीय उदा. चुलते भोसले, बाजी घोरपडे, व्यंकोजी भोसले वगैरे आदिलशहाच्या बाजूने लढत होते. बंगळुरात स्वतः: शहाजीराजे अखेरपर्यंत आदिलशाहीचे मनसबदार होते. कोकणातले खेमसावंत, शिर्के प्रभूती स्वराज्याच्या विरोधात कारवाया करण्यात कोणतीही कुचराई करीत नव्हते. (त्यांचा बंदोबस्त करताना संभाजीराजे औरंगजेबाच्या हाती सापडले.) दक्षिणेत राजांनी मदुराई, तंजावर आदी प्रांतातल्या हिंदू नायक राजांशी लढाया करून ते प्रदेश स्वराज्यात जोडले. कुतुबशाहीशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवलेले दिसतात. जयसिंग, जसवंतसिंग आदी राजपूत सरदार मोगलांच्या बाजूने राजांशी लढले. म्हणजे महाराजांचा तत्कालीन मुस्लिम शासकांशी असलेला लढा राजकीय स्वरूपाचा होता हे सुस्पष्ट आहे. त्याला हिंदू-मुस्लिम धार्मिक आणि मुस्लिमद्वेषाचा सोईस्कर रंग फासण्याचे राजकारण फसवे आहे.
कुळवाडीभुषण :
हिंदवी स्वराज्य म्हणून राजांची एक व्यापक संकल्पना नक्कीच होती. आपल्या प्रजेची सुव्यवस्था, रक्षण ह्याबाबतीत राजे "शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका" असा सज्जड कायदा राबविताना दिसतात. स्वराज्याची महसूल-मुलकी व्यवस्था, न्यायप्रणाली ह्याबाबत राजांची धोरणे आदर्शवत होती. म्हणून शिवराय 'रयतेचा राजा' म्हणून ओळखले जातात. त्याअर्थाने 'कुळवाडीभुषण', बहुजनप्रतिपालक हे प्रतीकात्मक शब्द 'गोब्राह्मणप्रतिपालक'च्या प्रतिवादासाठी वापरले गेले.

No comments:
Post a Comment