कोहली आणि कंपनीने कुंबळेची 'कोचगिरी' नाही पटली तर त्याला बाहेरचा
रास्ता दाखवला ह्यात काय गैर आहे? ग्रेग चॅपल केसमध्ये गांगुली, सचिन वगैरे
लोकांनी ह्याच मुद्द्यावर त्याला बाहेरचा रास्ता दाखवला होता. गावस्कर
वगैरे मंडळींना लगेच कुंबळे किती महान खेळाडू होता इत्यादी फालतू गोष्टी
आठवू लागल्या. त्याच्या महानपणाचा काय संबंध कोच असण्याशी? तसंतर
कोहली'ऑलटाइम ग्रेट' होण्याच्या मार्गावर आहे! कोहलीच्या नेतृत्वाखाली
भारतीय संघाने भारतात झालेल्या दोनतीन मालिका जिंकल्या म्हणून कुंबळेची
कामगिरी कोच म्हणून चांगली दिसते, एवढेच.
मुळात कुंबळेची गेल्यावर्षी झालेली निवड निकष डावलून झाली होती आणि तिथेच
भारतीय क्रिकेटमधली अनप्रोफेशनल वृत्ती पुन्हा स्पष्ट झाली होती. तेव्हाच
नापास उमेदवार शास्त्रीला गांगुलीने त्याच्या व्यवसायकितेच्या अभावाचे खडे
बोल व्यवस्थित सुनावले होते. बरं 'कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट' ह्या निकषांवर
तर ह्यांची व्यावसायिकता सदैव साफ उघडी पडलेली असते, तो वेगळा मुद्दा.
कुंबळे कोच म्हणून दादागिरी (intimidating) करतो अशी तक्रार काही खेळाडूंची
होती, असं म्हणतात, ह्यात तथ्य असावे. कारण "first choice unfit players
will have to prove their fitness in the same (not one day) format!!!"
असले असंबद्ध जाचक नियम कुंबळेने खेळाडूंवर बंधनकारक केले होते. म्हणजे
रोहित, शिखर, शमी हे फिट असूनही आणि स्थानिक वनडे क्रिकेटमध्ये खेळूनही
कुंबळेच्या निकषानुसार कसोटीसाठी पात्र नव्हते कारण त्यांचा एकदिवसीय
सामन्यातील फिटनेस कुंबळेच्या तथाकथित निकषांमध्ये बसत नव्हता! हे
ऑस्ट्रलिया दौऱ्याच्यावेळी दिसले होते. हे असले सुलतानी किंवा सरकारी किंवा
फडणविषी 'निकष' लावणारा माणूस खेळाडूंना कसा चालेल? भारतीय क्रिकेटच्या
दृष्टीने कोहली आणि त्याचे इतर सहकारी खेळाडू महत्वाचे आहेत. कोच,
व्यवस्थापक वगैरे लोक्स काय, येतील आणि जातील...
Kumble's resignation is a smart game plan by Kohli & Co. through the champions Trophy final for his 'intimidating' ways of coaching although board & coach selector's backed him again after his appointment last year though he was not qualifying the requirements!?
Rohit Sharma, Mohammed Shami & Shikhar Dhawan are fit now and playing in Vijay Hazare Tophy.
Murli Vijay is not fit & Abhinav Mukund's has been exposed, however Anil Kumble's strange southindian logic says that first choice unfit players will have to prove their fitness in the same (not one day) format!!!
BULLSHIT
Kumble's resignation is a smart game plan by Kohli & Co. through the champions Trophy final for his 'intimidating' ways of coaching although board & coach selector's backed him again after his appointment last year though he was not qualifying the requirements!?
Rohit Sharma, Mohammed Shami & Shikhar Dhawan are fit now and playing in Vijay Hazare Tophy.
Murli Vijay is not fit & Abhinav Mukund's has been exposed, however Anil Kumble's strange southindian logic says that first choice unfit players will have to prove their fitness in the same (not one day) format!!!
BULLSHIT
- कोणी म्हणतो सिलेक्शनची गॅरंटी असेल तरच 'कोच' साठी अर्ज भरतो. कोणी 'कोच' जाताजाता फेसबुकच्या धोबीघाटावर केकाटून जातो. 'कोचगिरीचे' हे फुकट चोचले.
- कोहली म्हणतो खेळाडू म्हणू आदर आहे पण नियमानुसार ड्रेसिंगरूमधल्या गोष्टी चव्हाट्यावर आणणार नाही. (ये हुई ना बात!)
- दरम्यान तथाकथित कोच अथवा मॅनेजर किंवा डायरेक्टर शिवाय भारतीय संघ वेस्टइंडीज दौऱ्यावर खेळतोय.
-
एखादाच 'कोच' असतो जो केनियाच्या नवख्या टीमला वर्ल्डकपच्या
सेमीफायनलपर्यंत नेण्याची कामगिरी करून दाखवतो. बाकी 'गाडिखालून चालणाऱ्या
कुत्र्याला आपणच गाडी हाकतोय कि काय असा फुकाचा रुबाब असतो' , अशी काहीशी
म्हण आहे मराठीत...
- रवीशास्त्री कॉमेंट्री बॉंकसमधेच बरा. त्याची जशी कोच म्हणून पात्रता नव्हती तेवढीच ती कुंबळेचीही नव्हती. पण आपले अव्यावसायिक माजी खेळाडू समितीवर असल्यावर प्रोफेशनल निर्णय कसा होणार? त्यामुळे कुंबळेची निवड करून ह्या समितीने शास्त्रीला फलंदाजीसाठी प्रशिक्षक म्हणून नेमण्याची सूचना बीसीसीआयला केली, जी धुडकावली गेली, हे छान झाले. शास्त्री, तुझी टीम डायरेक्टर म्हणून कारकीर्द फार देदीप्यमान वगैरे नाही. तू कॉमेंट्री बॉंकसमधेच बरा.
- अनिल कुंबळे नक्की कोणता बॉलर होता ते कधी त्याला किंवा क्रिकेटलाही समजलं नाही. त्याचा बॉल कधी लेगस्पिन झालाच नाही म्हणून त्याला क्रिकेतपंडित गुगली वगैरे म्हणत असावेत. पण तो बहुदा मध्यमगती गोलंदाज होता आणि ज्यास्त न धावता बॉल फेकायचा. ह्या क्रिकेटच्या पुस्तकाबाहेरच्या बॉलिंगमुळे त्याला भारतीय खेळपट्ट्यावर स्पिनर समजून खेळणारे बॅट्समन खोऱ्याने बळी पडले व तो गावस्कर म्हणतो तसा महान गोलंदाज म्हणून प्रसिद्ध झाला . तो मूळचा फलंदाजच होता चुकून त्याला बॉलर आणि त्यात लेगस्पिनर असे लेबल लागलं ज्याचा कधीही बॉल लेगस्पिन झाला नाही असा महान लेगस्पिनर म्हणजे अनिल कुंबळे होय.
No comments:
Post a Comment