Monday, 27 January 2014

सेफ़ोलोजि च्या आकडेवाल्यांची विक्रमी भविष्यवाणी

27/01/2014 (फेसबुक पोस्ट)


सेफ़ोलोजिस्ट नावाच्या आधुनिक ज्योतिषानि भाजप (२०० च्या वर जागा) विजयी आणि काँग्रेस पराभूत (१०० पेक्षा कमी जागा) अशी भविष्यवाणी अलीकडे केली...एकामागून एक ३-४ कडमडे एकमेकाची री ओढत त्या भविष्यवाणीत सामील हि झाले! आणि काँग्रेस आणि भाजप दोघेही गार झाले!
१२० कोटीच्या खंडप्राय देशभरातून फक्त १८५९१ लोकांना काही प्रश्न विचारून ह्या नव-ज्योतिषांनी हे आकडे फेकले आहेत!

ह्या आधुनिक कडमड्या विद्वानांनी काढलेले निष्कर्ष लय भारी बर का मंडळी! जागांचे आकडे काँग्रेस आणि भाजपला अनुक्रमे १०० आणि २०० असे फेकताना त्यांनी दिलेली मतांची टक्केवारी विलक्षण आहे!

१. कॉंग्रेसला २७% मते मिळतील असे ते म्हणतात. मागिल निवडणुकीत कॉंग्रेसला २८.६ % मते मिळाली होती. म्हणजे १.६% मते कमी.
२. भाजप ला ३४% मते मिळणार असे ते म्हणतात. मागिल निवडणुकीत भाजपला १८.८ % मते मिळाली होती. म्हणजे तब्बल १५.२ % मते जास्त! जवळजवळ दुप्पट मतदान ?!

आजवरच्या इतिहासात ह्या दोन्ही पक्षांना कधीही इतकी प्रचंड वाढ मतदानाच्या टक्केवारीत झाली नाही हा इतिहास आहे!

२१ व्या शतकात झालेल्या १९९९, २००४ आणि २००९ च्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप ह्यांची टक्केवारी अनुक्रमे २८.३०% २३.७५% , २६.५३% २२.१६% , २८.५५% १८.८०% अशी होती.
म्हणजे साधारणत: २-४% मते कमी जास्त होताना दिसतात!

९० च्या दशकातील निवडणुकात हीच आकडेवारी १९९८- २५.८२% २५.५९% , १९९६- २८.८०% २०.२९%, १९९१- ३५.६६% २०.०४%, १९८९- ३९.५३% ११.३६% अशी अनुक्रमे काँग्रेस आणि भाजप साठी होती!

रथयात्रा आणि मंडल-कमंडल ह्या अडवाणीछाप राजकारणातून २०-२५% मतांची टक्केवारी भाजपने गाठली हे उघड आहे. १९८४ मध्ये काँग्रेस आणि भाजप ची टक्केवारी अनुक्रमे ४९.०१% & ७.७४% होती हे लक्षात घ्या.

हे आकडेबहाद्दर शहरी भागात काँग्रेस आणि भाजप दोघांना मागील मतांची टक्केवारी १% ने वाढेल असे म्हणताहेत. तर भाजपला ग्रामीण भागात ९% मते मागील निवडणुकीपेक्षा जास्त मिळतील आणि कॉंग्रेसची १% कमी होतील असेही हे तज्ञ म्हणत आहेत. अर्थात मुख्यत: ग्रामीण भागात भाजपला मिळणारी १०% जास्त मते त्यांची एकूण टक्केवारी १५% ने वाढवीत आहे असा ह्या विद्वानांचा जावईशोध आहे!

१२० कोटी लोकसंखे मधून साडेअठरा हजार मतदारानि ज्या थापा ह्या कडमड्यानी नोकरीवर ठेवलेल्या कारकुनांसमोर मारल्या असतील त्यावरून हा आकडा लावला गेला आहे!

हा कुणाला सोयीस्कर आकडा आहे ? सर्वांचा आकडा सारखा का आहे ?? कुणाच्या डोळ्यात धूळफेक आहे ??? ह्या कडमड्यांच्या दांड्या एकट्या केजरीवाल ने अलीकडेच उडविल्या होत्या हे विसरू नका!  

बर, ज्योतिष आणि आकडा ह्यांचे प्रचंड वेड असलेल्या आपल्या संस्कृतिप्रीय देशाने त्या त्या चानेल वर डोळे खिळवून त्यांचा TRP मात्र इमानेइतबारे वाढविला !

No comments:

Post a Comment