मिडीयाने 'राष्ट्रवादीला' लक्ष्य करण्यामागचे रहस्य:
मागील लोकसभा निवडणुकीतील राज्यातील मतदानाची आश्चर्यकारक आकडेवारी:
काँग्रेस : ७२,५३,६३४ मते (१९.६१ %) - १७ जागा (२६)
राष्ट्रवादी : ७१,३१,१७५ मते (१९.२८ %) - ८ जागा (२२)
शिवसेना : ६२,८७,९६४ मते (१७ %) - ११ जागा (२२)
भाजप : ६७,२१,६४४ मते (१८.१७ %) - ९ जागा (२६)
फक्त २२ जागा लढविणाऱ्या राष्ट्रवादीची एकूण मते आणि त्यामानाने मिळालेल्या ८ जागा ह्यांचे व्यस्त प्रमाण लक्षात घ्यायला हवे. २६ जागा लढविणाऱ्या कॉंग्रेसच्या जवळपास मते (लाखभर कमी) राष्ट्रवादीला मिळालेली दिसतात. तेवढ्याच जागा लढविणाऱ्या शिवसेनेपेक्षा सुमारे १० लक्ष अधिक मते आणि २६ जागा लढविणाऱ्या भाजप पेक्षाही ४ लाख जास्त मते राष्ट्रवादीला पडली होती.
अर्थात राष्ट्रवादीला ताकदीपेक्षा फारच कमी जागा मिळाल्या असे दिसून येते.
राष्ट्रवादीने येत्या निवडणुकीत महाराष्ट्रात चमत्कार घडविला तर आश्चर्य नाही!
राष्ट्रवादी राज्यातील नं. १ चा पक्ष आहे आणि ८-१० लोकसभेच्या जागा हा राष्ट्रवादीचा कमीतकमी चा आकडा आहे हे मिडीयाच्या आकडे तज्ञांना नक्कीच माहीत आहे.
राष्ट्रवादीच्या जागा फक्त वाढू शकतात. ८-१० ते १५-१६ अशी कितीही भरारी राष्टवादी घेऊ शकते. NCP has nothing to loose and everything to gain!
आप आणि मनसे ची भर पडल्याने इतर पक्षांच्या (काँग्रेस-शिवसेना-भाजप) जागा कमीच होऊ शकतात.
अर्थात 'राष्ट्रवादी' हे महाराष्ट्रात पुढील काळात मोदी संचलित मिडियाचे एकमेव लक्ष्य असेल हे स्पष्ट आहे.
प्रसार माध्यमांनी मोदीला हवा भरण्याचे काम चालवले आहे हे त्या सर्वांच्या ओपिनियन पोल मधून आधीच स्पष्ट झाले आहे. येनकेनप्रकारेण मोदीला आणि भाजपला सोयीस्कर भूमिका घेण्याचे कार्य पत्रकार आणि मीडियाद्वारे अलीकडे घेतल्याचे दिसून येते आणि पुढील काळात देखील घेतली जाईल.
मिडीयाच्या ओपिनियन पोलची पोलखोल अलीकडेच झाली आहे. तसेच वृत्त वाहिन्यांच्या संपादकांना काढून टाकण्याचे, तंबी देण्याचे प्रकार झाल्याच्या हि बातम्या आहेत.
मिडिया आणि भांडवलशाहिचे संबंध लक्षात घेता निवडणुकीच्या तोंडावर साटेलोटे होण्याचे सहज शक्य आहे. त्यात 'आपडा माणस' इफेक्ट देखील अत्यंत महत्वपूर्ण आहे हे लक्षात घेतले पाहिजे!
लोकशाहीचा चौथ्या खांबाचा बैलबाजार झाल्याचे गांभीर्य लक्षात घ्यायला हवे!

No comments:
Post a Comment