Monday, 3 March 2014

आणि अडवाणीजीना हुंदका अनावर होतो...



रथयात्रेची धामधूम आठवते
मंडलची होळी मस्तकात पेटते
भूतकाळातील वणवण मनात रणरणते
हेचि फळ काय मम तपाला, मन आक्रंदते
बाबरीचा धुरळा श्वासात घुसमटतो
आणि अडवाणीजीना हुंदका अनावर होतो...

अटलजींचे शब्द आठवतात
'राजधर्म' कानात घोंघावतो
पायातली वहाण पायातच बरी होती
सिंहासनि घुसवायला नको होती
आठवणींचा मळभ दाटतो
आणि अडवाणीजीना हुंदका अनावर होतो...


त्यांचे दोनाचे दोनशे कोणी केले
ते दिल्लीतख्त कुणी सर केले
त्यांना सत्तेची सूत्रे ही सोपविली
त्यांच्या राजधर्माची लाज वाचविलि
मागे वळूनी पाहता काळ गळ्यात आवंढतो
आणि अडवाणीजीना हुंदका अनावर होतो...

सेकुलरांच्या सत्तेने दमछाक केली
जीनांची थडगी मानगुटीवर बसली
दंगलजखमेच्या मलमाच्याही अभावी
अयोध्ये
ची पादुका दिल्लीत कशी शोभावी?
हिंदुत्वाचा झेंडा अडगळीतून आक्रोशतो
आणि अडवाणीजीना हुंदका अनावर होतो...

No comments:

Post a Comment