निवडणुकीचा रागरंग :
१. कोंग्रेसेतर तिसर्या आघाडीची लगीनघाई आणि मांडवातल्या मारामार्याहि नेहमीच्याच आहेत.
२. अलीकडे सेन्सेक्स वाढणे हे नवे अंतरिम बजेट, निवडणूकीच्या निमित्ताने जाहीर केलेल्या लोकप्रिय योजना आणि एकंदरीत उत्साहवर्धक वातावरण ह्यांचा परिणाम हि असू शकेल.
३. अमेरिकेने विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करणे हे काही आपल्याला नवे नाही. सोनिया गांधी, अडवाणी ह्यानाही कधीकाळी तो बहुमान मिळाला होता.
४. भांडवलशाही मोदीच्या मागे उभी आहे हे मात्र वास्तव आहे.
आणि म्हणूनच त्यांची लोकप्रियता जी भांडवलशाही मिडीयाने फुगविली आहे ती आपण पाहतो.
महाराष्ट्रात कोन्ग्रेस-राष्ट्रवादीला आजही १२ आणि महायुतीला ३३ जागा देणाऱ्या सर्व्हेच्या बद्दल तर आता न बोललेलेच बरे, अशी परिस्थिती आहे.
५. भाजप, संघ, मित्रपक्ष आणि त्यांचे नेते ह्यांच्या अलीकडील सुंदोपसुंदी, लंगडी-खोखो, लपाछपी, इ. खेळ-खंडोबा लक्षात घेता 'अंदरकी बात' काय आहे तेही स्पष्ट झाले आहे.
६. हि लढत भासवली जाते तशी एकतर्फी नक्कीच नाही. हिंदुस्तानांत टक्कर अपेक्षित आहे, दक्खन मात्र साधारणता: काँग्रेस आघाडीशी एकनिष्ठ राहते.
७. बिहार-युपी मध्ये ७० जागा मिळविण्याची शक्यता किती आहे? लालू-कोन्ग्रेस बिहारमध्ये एकत्र आले आहेत. नितीश चे लोकप्रिय आणि प्रगतीशील सरकार आहेच. म्हणजेच बिहार एकतर्फी नाही.
८ युपी मध्ये ५० जागांचे स्वप्न पाहणारी भाजपचे आज फक्त १० खासदार आहेत. कॉंग्रेसचे २०, सपा चे ३५ आणि बसपचे २० अशी साधारण स्थिती आहे. सपा-बसपा मिळून किमान ४० जागा तरी घेतीलच. इथे 'भारी उलटफेर' ची शक्यता आहे का?
९. गोष्टीच्या पुस्तकातील राक्षसाचा जीव एखाद्या पोपटा मध्ये असतो तसा भाजपचा प्राण युपी-बिहार मध्ये त्यांनीच अडकवून ठेवला आहे. ह्याच उत्तरेतील जुगारावर मोदी खुर्चीचे दिवास्वप्न पाहत आहेत.
10. युपी-बिहारचे मतदार त्या 'पोपटाचा' जो काही निकाल लावायचा तो लावतीलच!

No comments:
Post a Comment