Wednesday, 12 March 2014

गांधीहत्येचे विकृत समर्थन : शरद पोंक्षेचा धिक्कार

शरद पोंक्षे सारखे मूर्ख विकृत सवंग प्रसिद्धीच्या हव्यासापोटी भडक वक्तव्ये करून समाजात तणाव निर्माण करतात. त्यांचा धिक्कारच व्हायला हवा. विचारांचा विरोध विचारानेच व्हायला हवा इतके ज्याला कळत नाही त्या अडाणचोट माणसाकडून गांधीच्या हत्येचे समर्थन नाही तर आणखी काय ऐकायला मिळणार?
हा माणूस नथूरामच्या नाटकाच्या निमित्ताने जो त्या भूमिकेत शिरलाय तो अजून बाहेर पडायचे नाव घेत नाही. अशाने अभिनयातील करीयरची वाट लागेल ना रे, पोन्क्ष्या, कळत कस नाय तुला.

आणि असेच पोंक्षे सारखे विशिष्ठ मानसिकतेने ग्रासलेले बांधव गांधी हत्येला गांधी वध म्हणवून गोडसेचे लंगडे समर्थन करून उघडे पडताना दिसतात तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते. अरे अजून किती खालच्या पातळीवर घसरणार तुम्ही?

  कुणीतरी सावरकर वाद्याने काहीबाही ट ला ट लावून फेसबुकवर टाकलं कि बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे त्यांच्या हिंदू कोड बिलात कोडकौतुक केले... झालं...मूर्खाच्या नंदनवनात राहणाऱ्या माकडांच्या हातात कोलीत भेटलं. अरे जरा विश्वासार्ह लिखाण तरी संदर्भासाठी द्या!

सोडा ते सावरकर-गोडसे...आणि स्वत:च्या भवितव्याचा विचार करा. काय शिकवताय तुम्ही तुमच्या पिढ्यांना? कोणते तत्वज्ञान देताय तुमच्या समाजाला? कुणाची फसवणूक करताय? स्वत:चीच ना रे!

हे तुमचे संस्कार...निघृण खून आणि भ्याड हल्ल्यांचे ?
हि तुमची संस्कृती... संत-महात्म्यांच्या हत्याकांडांची ?

बदला बाबानो...गांधीच सोडा, तो महात्माच होता, आहे आणि राहील. त्याला काही फरक पडत नाही. परंतु, तुम्हाला येणारा काळ क्षमा करणार नाही. सावध व्हा.

No comments:

Post a Comment