Friday, 14 March 2014

निखिल वागळेमधल्या मुत्सद्दी मुलाखतकाराला सलाम

विविध विषयावर आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या मुलाखती निखिल वागळे ज्या सहजतेने आणि सफाईदारपणे घेतात ते पाहता त्यांच्या मुलाखत घेण्याचे कौतुक वाटते हे नक्की. एखादी व्यक्तिरेखा उलगडून दाखविण्याची त्यांची शैली आणि 'त्यातलं पान न पान वाचण्याची' त्यांची हातोटी हि विलक्षणच.

केजरीवाल हा काही मोदी नाही कि करण थापरच्या अडचणीच्या प्रश्नांनी गांगरून पळून जाईल. तसेच तो राहुल गांधीही नव्हे कि जो अर्णब गोस्वामीच्या आक्रमकतेसमोर कमी पडेल. केजरीवाल मुलाखतीत स्वत:चा वरचष्मा कसा ठेवतो ते राजदीप सरदेसाई च्या मुलाखतीत दिसले होते.

निखिल वाग
ळेनी त्याला डॉमीनेट केले असे काही दिसत नाही; उलट केजरीवाल ने त्याच्या नेहमीच्याच तत्परतेने आणि वाक्चातुर्याने त्ये मुलाखतीत स्वत:चाच अजेंडा राबविला असेच दिसते.
अगदी मोदीवर घणाघाती टीका करण्यापासून ते मीडियाची पोलखोल करण्या पर्यंत सर्वच मुद्दे त्याने हिरीरीने मांडले.

तीच मुलाखत इतर कुणी पत्रकाराने घेऊन दाखवावी, केजरीवाल समोरच्याला कच्चा खाऊन जाईल.
वागळेनि मुलाखत रंगविलीहि आणि आपल्याला हवे तेही शब्दहि केजरीवालच्या तोंडातून वदवून घेतले. निखिल वागळेचे कौशल्य हे म्हणावे लागेल कि त्या मुलाखतीत केजरीवाल समोर ते कुठेही निरुत्तर किंवा कमी पडले नाहीत.

मागे बाळासाहेबांची ऐतिहासिक ठरलेली मुलाखत वागळे नि घेतली होती त्याच दरम्यान इतरही काही पत्रकारांनी सेनाप्रमुखांची मुलाखत घेण्याचे ध्यैर्य दाखविले होते. परंतु वाघासमोर शेळपटून गेलेले ते पत्रकार मातोश्रीवर उगाच काहीबाही गुळमुळीत प्रश्नोत्तरे आटपून परतले होते. उलटपक्षी वैयक्तिक संबंध चागले नसूनही मातोश्रीवर जाऊन आणि अभयदान घेण्याचे चातुर्य दाखवून वागळे नि अशी काही मुलाखत घेतली कि त्या निवडणुकीचे चित्र बदलणारी ती ऐतहासिक घटना ठरली.

निखिल वागळेमधल्या त्या मुत्सद्दी मुलाखतकाराला सलामच.

No comments:

Post a Comment