Thursday, 20 March 2014

हिंदू दहशतवादाचे समूळ उच्चाटन कधी होणार?

स्वातंत्र्योत्तर भारतात तीन अत्यंत महत्वपूर्ण अशा राष्ट्रीय नेत्यांच्या हत्या घडल्या.
१. महात्मा गांधी २. इंदिरा गांधी ३. राजीव गांधी

इंदिरा गांधींची हत्या १९८४मधे शीख समाजातील दहशतवादी संघटनेकडून झाली. स्वतंत्र खलीस्तानच्या आंदोलनातून शीख समाजामध्ये काही दहशतवादी संघटना उदयास आल्या होत्या. ऑपरेशन ब्लू-स्टार च्या निमित्ताने भारतीय सैन्याने केलेल्या सशस्त्र कारवाई च्या प्रतिक्रिया स्वरूप इंदिरा गांधींची हत्या केली गेली. परिणाम असा झाला कि पुढील २-४ वर्षात खलिस्तानची मागणी आणि शीख दहशतवाद दोन्हीचे उच्चाटन झाल्याचे दिसून येते.

राजीव गांधींची हत्या तमिळ अतिरेकी संघटनेकडून १९९१ मध्ये करण्यात आली. स्वतंत्र तमिळ राष्ट्राच्या मागणीसाठी श्रीलंकेत सशस्त्र आंदोलन करणाऱ्या ह्या संघटनेला राजीव गांधीच्या श्रीलंकेत  शांतीसेना पाठविण्याचा निर्णय खटकला होता. पुढील काही वर्षात श्रीलंकेतून तमिळ अतिरेकी आणि  LTTE चे उच्चाटन झाल्याचे दिसून येते.

महात्मा गांधींची हत्या देखील १९४८ साली अशाच एका दहशतवादी घटनेतून झाली. गांधीहत्या हि स्वतंत्र भारतातील पहिली दहशतवादी घटना. अखंड हिंदुस्तान, हिंदू राष्ट्रवाद, मुस्लिमविरोधी कट्टरता वाद इ. हिंस्त्र विचारसरणिवर आधारित हिंदू दहशतवादी संघटनांकडून महात्मा गांधी ची हत्या घडवून आणली गेली.

गांधी हत्येमधील आरोपी नथुराम गोडसे ह्याला फाशी झाली परंतु वीर सावरकर पुराव्या अभावी सुटले. ह्या हत्येमागे सावरकरांचा ब्रेन असल्याचा संशय होता. त्यांची हिंदू महासभा हि नामधारी हिंदुत्ववादी संघटना नंतर नामशेष झाली. रा.स्व.संघालाहि दहशतवादी संघटना घोषित करून त्याच्यावर बंदी देखील घातली होती. नंतर ती उठवली गेली.  आजचा प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप (पुर्वश्रमीचा जनसंघ) हा देखील ह्या संघाचीच निर्मिती आहे. रथयात्रा, राम मंदिर, बाबरी विध्वंस, गुजरात दंगली, बॉम्बस्फोट आणि आता मोदी इ. मार्गाने त्यांचा छुपा हिंदू दहशतवाद सातत्याने आजही कार्यरत आहे. बजरंगदल, सनातन इ. धर्मांध पिलावळी आजही कार्यरत आहेत.

ह्या हिंदू दहशतवादाला धर्मनिरपेक्षता, लोकशाही, राज्यघटना, तिरंगा इ. भारतीय राष्ट्रवादाचे वावडे आहे. त्यांचा स्वत:चा सोयीस्कर असा हिंदू राष्ट्रवाद आहे. हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व असेही त्यांचे स्वयंघोषित राष्ट्रीयत्व आहे. जयतु हिंदू राष्ट्रम नावाचे तथाकथित ब्रीदवाक्यहि आहे. ह्या भगव्या दहशतवादाला   धर्मनिरपेक्षता किंवा सेकुलर ह्या शब्दांचाही भयंकर तीटकारां आहे असेही दिसून येते.

इंदिरा आणि राजीव हत्येच्या नंतर ज्या वेगाने शीख आणि तमिळ दहशतवाद नष्ट झाला ते पाहता गांधीहत्येनंतरहि हिंदू दहशतवादाचे मात्र अजूनही उच्चाटन झाल्याचे दिसत नाही. विविध मार्गांनी आणि विविध पातळ्यांवर हा दहशतवाद आजही डोके वर काढताना दिसतो. त्याचे समूळ उच्चाटन कधी होणार?

No comments:

Post a Comment