Monday, 4 August 2014

सिंहासन (पार्ट-२)

सिंहासन (पार्ट-२)

८०च्या दशकातील प्रसिद्ध चित्रपट सिंहासनचा दुसरा पार्ट .

मुख्यमंत्र्यांची (अरुण सरनाईक) खुर्ची टिकविण्याची प्राणांतिक धडपड...
मंत्रिमंडळातील (दत्ता भट, मधुकर तोडरमल) अशा अनेक मंत्र्यांचा त्या खुर्चीवरील डोळा.
आणि त्या खुर्चीच्या खेळातील (श्रीकांत मोघे, माधव वाटवे, मोहन आगाशे, इ.) राजकारण्यांचे आणि विरोधी पक्षनेत्यांचे डावपेच.


अर्थमंत्री (डॉ. श्रीराम लागू) ह्यांची राजीनाम्याची खेळी आणि मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
प्रदेशाध्यक्षांची लाचार ओढाताण...

अटीतटीच्या जीवघेण्या राजकीय संघर्षात शेवटी मुख्यमंत्र्यांची निसटती सरशी...

सर्व राजकारणाची जशीच्या तशी पुनरावृत्ती...!!!
फक्त कालानुरूप नव्या आवृत्तीत काही बदल.

कामगार नेते (सतीश दुभाषी) स्वत: राजकारणात...
अंडरवर्ल्ड (नाना पाटेकर, रवींद्र मंकणी) सुद्धा राजकारणात...
स्त्री पात्रे (रीमा लागू , लालन सारंग) ह्यांना सत्तेतील अधिक सहभाग...
पत्रकार (निळू फुले) देखील भांडवलशाही आणि राजकारणाच्या विळख्यात...

भूकबळी, कुपोषण, सामाजिक-आर्थिक विषमता, दलित अत्याचार, उपोषण, संप, शेती-उद्योगाचे प्रश्न, गरिबी-बेकारी सर्व प्रश्न तेच, तिथेच!

"उष:काल होता होता काळरात्र झाली,
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली."
ह्या गाण्याची तीव्रता मात्र कित्येक पटीने जास्त!

No comments:

Post a Comment