शिवरायांच्या निधनानंतर दिल्लीचा पातशहा औरंगझेब आणि सेनापती
जुल्फिकारखान लक्षावधीचा फौजफाटा आणि कोट्यावधीचा खजिना घेऊन महाराष्ट्रात
उतरला. खुद्द महाराष्ट्रातील अनेक फुटकळ-फितूरहि त्याला सामील झाले.
मोजून सव्वीस वर्षे महाराष्ट्र काबीज करण्यासाठी आलमगीर आणि त्याचा सेनापती जंग जंग पछाडत होते. पण शिवरायांच्या स्वराज्याच्या विचाराने अवघा महाराष्ट्र पेटून उठला आणि बलाढ्य दिल्लीपतीच्या परचक्राला भिडला! संभाजी-हंबीरराव, राजाराम-ताराबाई, संताजी-धनाजी ह्यांच्या नेतृत्वाखाली मराठी माणूस पावशतकभर संघर्षरत राहिला आणि महाराष्ट्राचे स्वराज्य अजिंक्य राहिले. शिवरायांचा महाराष्ट्र, स्वराज्याचा सह्याद्री आक्रमकांना पुरून उरला!

आलमगीर शेवटी महाराष्ट्राच्या मातीत विसावला आणि सेनापती तर देशोधडीला लागला. हा इतिहास आहे!
मराठी माणसाचा तो प्रदीर्घ लढा म्हणजे महाराष्ट्राचे आद्य-जनआंदोलन आणि आद्य-जनादेशहि होय!
राजा-राज्य-सैन्य-किल्ले-खजिना ह्या केवळ कागदी संकल्पना असून महाराष्ट्राची अस्मिता हीच एक शाश्वत प्रेरणा असल्याचे त्या महायुद्धाने स्पष्ट केले!
-- राकेश पाटील.

No comments:
Post a Comment