अलीकडे जमीयत उलेमा या मुस्लिम संघटनेचे मुफ्ती मोहम्मद इलियास ह्यांनी
"भगवान शंकराला पैगंबर मानण्यास मुस्लिमांची काहीच हरकत नाही. आमचे आई-वडील
एक आहेत, त्यांचं रक्त एक आहे, त्या नात्यानं आमचा धर्मही एकच आहे," असं
वक्तव्य करून "हिंदू राष्ट्राला मुस्लिमांचा अजिबात विरोध नाही.
ज्याप्रमाणे चीनमध्ये राहणार चिनी, अमेरिकेत राहणारा अमेरिकी तसा
हिंदुस्थानात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. हे तर आमच्या देशाचं नाव
आहे." अशीही भूमिका मांडली होती.
त्यावर आमच्या काही विद्वान मित्रांनी त्या भूमिकेमागच्या छुप्या अजेंड्याचा पर्दाफाश करून ते वक्तव्य म्हणजे पद्धतशीर इस्लामिकरणाचा धर्मांध डाव असल्याचा शोध लावला होता.

कालच कोणत्या तरी मुस्लिम संघटनेने त्या मुफ्ती मोहम्मद इलियासविरुद्ध सिरकलम फतवा काढल्याचे ऐकले.
मग आता त्या मुफ्ती मोहम्मद इलियासला खालीलपैकी कोणत्या वर्गात बसवायचं?
१. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के इशारे पर शरीयत के खिलाफ उलटा-सीधा बयान देनेवाला इस्लामविरोधक ?
२. हिंदूंचे इस्लामीकरण करू पाहणारा हिंदुद्वेष्टा ?
३. सामाजिक सौहार्दासाठी कट्टर धार्मिकता सोडून व्यापक आणि क्रांतिकारक भूमिका मांडणारा आधुनिक अवलिया ?
ऑल इंडिया फैजान-ए-मदीना काउंसिलचे अध्यक्ष मुईन सिद्दिकी ह्यांनी मुफ्ती इलियासला देहदंडचा फतवा सुनावला आहे! इस्लामच्या कट्टर धर्मगुरूना ते वक्तव्य इतकं टोकाचं इस्लामविरोधी आणि आक्षेपार्ह वाटतेय आणि आमचे काही विद्वान त्यावर संशोधन करून ते हिंदूविरोधी आणि इस्लामीकरणाचा डाव इत्यादी असल्याचं सांगताय. ह्या विरोधाभासाचा अर्थ काय? ते वक्तव्य दोन्ही बाजूंसाठी अडचणीचं का ठरावं?
मग पर्याय ३ जास्त विश्वासार्ह वाटतोय.
अर्थात मुफ्ती इलियास हा सामाजिक सौहार्दासाठी कट्टर धार्मिकता सोडून व्यापक भूमिका मांडणारा आधुनिक अवलिया असल्याचे चित्र समोर येते.
त्याचं किमान हिंदू वर्गाकडून तरी तहेदिल स्वागत व्हायला हवे होते. पण तसं झालेलं दिसत नाही. अशी प्रागतिक भूमिका मांडणाऱ्या मुफ्तीला दोन्ही बाजूकडून उडवून लावण्यात आले. कदाचित ती भूमिका दोन्ही बाजूंच्या सोयीची नसावी, एवढंच.

No comments:
Post a Comment