'खोट्यावर खोटे' नावाची एक गोष्ट चांदोबामध्ये तीसेक वर्षापूर्वी वाचली होती.
तर, एका भल्या माणसाची बायको भारी कजाग होती. तिला खोटं बोलायची लयभारी खोड. एक खोटं बोलायचं आणि मग ते लपवायला खोट्यावर खोटं बोलत जायचं, अशी तिची आदत होती. नवऱ्याने कितीही समजावलं तरी ती त्याचे सल्ले नेहमी उडवून लावीत असे. ह्या भांडकुदळ आणि जहांबाज बाई पुढे नवऱ्याने बिचाऱ्याने अक्षरश: हात टेकले होते. तसंच शेजारी-पाजारी, गावकरी सर्वजण तिच्या खोट्या भाईगिरीने त्रस्त झाले होते.
....शेवटी खोटं बोलायच्या खोडीने ती स्वत: मोठ्या संकटात सापडते आणि तिचं पितळ उघडं पडते.
अशी ती चांदोबामध्ये लहानपणी वाचलेली गोष्ट. त्यातलं ते चित्र मला आजही आठवते. शेवटी गयावया करणारी ती बाई आणि तिला सल्ल्यांची आठवण करून देणारा तो भला माणूस, असं ते छान चित्र होतं.

त्याचं असं झालं कि, 'मी मराठी लाइव्ह' ह्या नव्या दैनिकात शनिवारी एक
तोरसेकरी खुसपट प्रसिद्ध झालंय. तसं पाहता ते खुसपट म्हणजे फिलॉसोफीचा
उत्तम नमुना आहे, असा आभास होईल. पण एका नव्या दैनिकाच्या दुसऱ्याच अंकात
तो विषयच मुळात 'गैरलागू' ठरतो आणि त्यातली 'भामटेगिरी' अधिकच ठळकपणे जाणवू
लागते.
म्हणजे, हे तत्वज्ञान प्रिंट मीडियात प्रसवण्याची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर गेल्या काही दिवसातील सोशल मिडीयावर त्यांनी जी गरळ ओकलेय , त्याचाच प्रभाव त्या तत्वज्ञानावर आहे, असं दिसेल. कॉम्रेडहत्येनंतर नथुरामि प्रवृत्तींच्या वकिलीसाठी जी खोटं बोलायची उबळ लागली, तिचेच ठसके तोरसेकरी फिलॉसोफीतहि उमटले आहेत. त्यामुळे 'तुमच्याकडून हिच अपेक्षा होती' असंच शीर्षक खरंतर असायला हवं होतं. असो.
अर्थात, त्यांचं जे काही चाललंय ते दुसरं तिसरं काही नसून 'खोट्यावर खोटं' ह्या चांदोबातल्याच गोष्टीची नवी आवृत्ती आहे, एवढंच.
( ता.क. :सॉक्रेटिस सुद्धा बायकोच्या त्रासाने प्रभावित होऊन तत्वज्ञान वगैरे लिहू लागला कि काय असा विचार उगाच मनात येउन गेला. )
('अपूर्ण'...)

No comments:
Post a Comment